Nilisha Deepak Popat
Akola
My experience with Manisha madam's counselling was very delightful. She is reliable, authentic and an excellent communicator. Her evaluation skills are impeccable and she gives accurate assessments to her subjects to prepare them for life. I was benefited not only by the psychoanalysis of her subjects and her outstanding knowledge in psychology, but also by her deep insight in mythology and spiritualism. She created a comforting environment and was quite reassuring and I'm thankful to her.
Dr. Kalyani Anvikar Paradkar
Akola
It doesn’t get crazier than this...nothing can prepare you for motherhood…a tiny wiggly human being can push you off the limits of joy and desperation at the same time…and how..My search for guidance during pregnancy began with good reads of course…being an avid reader…but it was not sufficient this time . A mutual family friend suggested me to visit Dr. Manisha Naik Madam. When I met her, first thing that struck a cord was her innate calmness and an infectious smile. One immediately gets drawn towards her. It was really an experience talking and learning from her. She was always receptive and supportive. One of the many things she told me during those sessions was “If I want to raise a prince/princess, I should treat myself like a queen.” I guess many women from all walks of life can relate with this. Its our responsibility to take care of ourself, our physical and emotional health to raise happy and healthy children. I shall always remember this message. I wish Dr. Manisha Naik Madam all the very best to all her future endevours . Please keep guiding women and always be the kindred spirit you are.
Gayatri Chandurkar
Nagpur
My experience as a parent with Naik Mam really was an influential one. As a parent I started supporting & giving guidance to my daughter. Now there is an open communication between my daughter & myself. This made our communication much easier. I also started giving time to my children and also providing affection, discipline & consistency. It was a very good experience indeed.
रेवती सुनील गोखले
अकोला
माझी ओळख मनीषा नाईक मॅडमशी मानूताई कन्या शाळा इथे झाली. माझी मुलगी इयत्ता दहावी मध्ये शिकायची. त्या वेळी मॅडम समुपदेशन (Counselling) सत्रासाठी आल्या होत्या. त्या सत्रासाठीमध्ये त्या जे काही बोलल्या त्याने माझं मन पूर्णपणे त्यांच्याकडे वळून गेलं होतं. मला त्यांच्याशी बोलायची इच्छा झाली, म्हणुन मी शाळेच्या शिक्षकांना याबाबत विचारले अणि तेव्हा पासून मॅडमची अणि माझी ओळख झाली. त्यांनी मला आणि माझ्या मुलाला पूर्ण मार्गदर्शन दिलं. 12th नंतर काय करायचे, कसे करायचे अणि कोणते महाविद्यालय घ्यायचे. पण सर्व गोष्टींचा नंतर पण सर्वात मोठा जो प्रश्न होता तो हा की इंजीनियरिंग च्या प्रवेशासाठी लागणारी फीस कुठून जमवायची. माझी हिम्मत होत नसतांना पण मी ही गोष्टं मॅडम समोर ठेवली. मी ज्या गोष्टीचा कधी विचार पण नव्हता केला ते घडलं. मॅडमने माझ्या मुलाची प्रथम वर्षाची पूर्ण फीस भरली. आज माझा मुलगा जे पण आहे ते फक्त मॅडममुळे. त्यांनी पूर्ण इंजीनियरिंग मध्ये माझ्या मुलाला मार्गदर्शन दिलं. आज माझ्या मुलाला चांगला जॉब मिळाला आहे ते फक्त मॅडम च्या मार्गदर्शनामुळे. मी मॅडम ची मनापासून आभारी आहे.
आई म्हणजे न थांबणाऱ्या अपूर्ण स्वप्नांचं वादळ. माझी मुलगी डॉ. अंकिता अश्विनी त्र्यंबक भराड, Medical Officer, हलकर्णी PHC , कोल्हापूर. आईची मुलीच्या नावाने असलेली ओळख म्हणजे स्वर्गसुख असते हे आज प्रखरतेने जाणवते. तो केवळ अनुभव नाही तर ते आयुष्याचे समाधान आहे. या प्रवासाची सुरवात जसे अंकिताला समजायला लागले तशी झाली. बिकट परिस्थिती, आर्थिक अडचणी, कौटुंबिक ताणतणाव या सगळ्यांवर मात करून हे कष्ट आज फळाला लागले आहेत. माझ्या मुलीला महाभारतातील श्रीकृष्णासारखी मी साथ दिली. पण प्रत्येक पाऊलावर आईसारखे असे खूप नाते खंबीरपणे उभे असतात. त्यात एक महत्वाचे नाते म्हणजे अंकिता आणि नाईक मॅडम यांचे. अंकिताच्या अभ्यासाच्या 'अ' पासूनच्या सर्वेसर्वा. तिला अभ्यास कसा करायचा हे सुद्धा मॅडमनी शिकवले. या सर्वांमध्ये त्यावेळी मनोबल खचलेल्या अंकिताला खंबीर करण्याचे काम मॅडमने केले. ते काम आज सुद्धा त्या करत आहेत. तिच्यासोबत राहतांना तिच्या वयाप्रमाणे तिला कसे समजून घ्यायचे हे त्यांनी मला शिकवले. नाईक मॅडमच्या रूपाने तिचे आयुष्य लक्ख चमकून टाकले. मॅडम तिच्या आई, मैत्रीण, सल्लागार, अशा अनेक रूपात तिच्या सोबत होत्या.
सौ. जयश्री वांगीकर
अकोला
आमचा मुलगा हर्ष याला कसली तरी भीती बसली होती. त्यामुळे तो शाळेतच जात नव्हता. तो खूप violent व्हायचा. psychiatrist ची treatment घेतली पण म्हणावा तसा फरक पडला नाही. अशात माझ्या एका मैत्रिणीने सुचवले - "तू त्याचे counselling करून घे." तिनेच मला मनीषा नाईक यांचे नाव सुचवले. माझ्या मते counselling म्हणजे - 'आपल्या problem वर समोरच्या व्यक्तीचे विचार आपणास पटून आपल्या शंकांचे समाधान होणे. योग्य मार्गदर्शन व सल्ला देणे.' आम्ही एकंदरीत हर्षची सर्व माहिती त्यांना सांगितली. मनीषा वहिनींनी नंतर आम्हा तिघांना एकत्र बोलाविले. हर्षशी पण त्या छान बोलल्या. हर्षनी पण त्यांच्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तरे दिली. त्याच्या वागण्यावरून त्याचा मनीषा काकुंवर विश्वास बसल्याचे जाणवले. मनीषा वहिनींच्या counselling मुळे हर्ष हळू हळू शाळेत जाऊ लागला. मनीषा वहिनींनी हर्षच्या शाळेत जाऊन अशा मुलांच्या बाबतीत शाळेने कसे सहकार्य करावे हे शिक्षकांना सांगितले. त्याचा आम्हाला खूप support मिळाला. औषधाने शरीर बरे होते पण मानसिक समाधान तेवढेच महत्वाचे असते. ते समाधान आम्हाला counselling द्वारे मिळाले. counselling मुळेच आम्हाला आमचा मुलगा हसता खेळता परत मिळाला.
सौ. पद्मश्री प्रदीप किडीले
अकोला
काही वर्षांपूर्वी माझ्यावर विपरीत परिस्थिती ओढवली होती. त्यामुळे मी व माझे कुटुंब मानसिकरित्या खचून जाऊ की काय असे वाटत होते. आम्हाला या प्रसंगातून बाहेर पाडण्यात एखाद्या परिपक्व समजदार व्यक्तीच्या सल्ल्याची गरज होती. तेव्हा माझ्या शाळेमध्ये समुपदेशक म्हणून मार्गदर्शन केलेल्या सौ. मनीषा नाईक यांचे सहकार्य निश्चितच लाभदायक ठरेल असे वाटले. आम्ही लगेच त्यांच्याकडे जाऊन घडलेल्या परिस्थितीबाबत सल्ला व मार्गदर्शन घेतले. त्याचा काही दिवसातच फायदा दिसला. नकारात्मक भावनेतून आम्ही सकारात्मक स्थितीत आलो. आजच्या काळात बऱ्याच कारणांमुळे विपरीत परिणाम घरातल्या प्रत्येकावर होत असतो. एक मानसिक दडपण असतं. ही परिस्थिती निवळली नाही त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. कलह निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत मानसिक अवस्था ढळू न देता समतोल राखावा लागतो. त्यासाठी योग्य समुपदेशनाची मदत मिळाली तर खरंच त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ प्राप्त होते. मी एक शिक्षिका आहे. मला असे वाटते की पालकांनी मुलांचे मानसिक आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी समुपदेशकाची मोलाची भूमिका असते.
वर्ष २०१३ ते २०१५ मी मुलाच्या (प्रथमेश कुळकर्णी) शिक्षणासाठी (IITJEE PREPARATION) अकोला येथे होतो. या दोन वर्षाच्या कालावधीत सौ मनीषा नाईक यांचे प्रथमेशला वेळोवेळी अमूल्य मार्गदर्शन मिळाले. शेक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करताना मुलांचे मानसिक स्वास्थ सुद्दढ राहावे या बाबीवर मॅडम ने भर दिला. मुलांना ध्यानधारणा (मेडिटेशन) यांचे महत्व समजावले. या विषयी मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी वर्ग घेतले. विध्यार्थ्यांचया समस्या समजावून घेऊन त्यांना समुपदेश करून मुलाचे समाधान त्या नेहमी करत असत. प्रथमेश ची चार एप्रिल 2015 JEE MAINS ची परीक्षा होती. तीन एप्रिलला नाईक मॅडमने स्वतः येऊन माझ्या मुलाला मोलाचे मार्गदर्शन केले यामुळे प्रथमेश मध्ये आत्मविश्वास वाढला. तो JEE Mains, JEE Advance परीक्षेत यशस्वी झाला. त्याला Indian Institute of Technology Bombay येथे २०१५ ला प्रवेश मिळाला. सौ नाईक मॅडम ने प्रथमेशला केलेल्या मार्गदर्शनामुळे त्याने हे यशाचे शिखर गाठले आहे. मी व माझा परिवार मॅडम चा ऋणी आहे.
सौ. शिल्पा ठाकूर
अकोला
पालकत्व हे एक आवाहन आहे. ती जबाबदारी पेलण्याकरिता पालकांना ते नेहमी मुलांसोबत आहेत ही जाणीव निर्माण करावी लागते. मात्र ती दिसते तितकी सोपी गोष्ट नाही. माझा मुलगा अथर्व. थोडा हट्टी. जसजसा तो मोठा होऊ लागला तसतसा त्याचा रागीटपणा, हट्टीपणा, मनासारखा न झाल्यास चिडचिड इ. बाबी जास्त प्रकाशाने जाणवू लागल्या. त्यामुळे पालक म्हणून आमची चिंता वाढली. त्याचवेळी मनीषाताईंचे नाव कोणीतरी सुचवले. त्यांच्याकडे गेल्यावर काही क्षणातच त्यांचे प्रसन्न हसरे व्यक्तिमत्व पाहून माझा ताण कमी झाला. त्यांची बोलण्याची हातोटी व समोरच्याला आपलेसे सारून घेणारी शब्दफेक मन मोहून गेली. काहीवेळातच त्यांनी अथर्वबद्दलची प्राथमिक माहिती घेतली. नंतर अथर्वशी संवाद साधला. अथर्वच्या भावना दुखावणार नाहीत आणि त्याला आवडेल अशा शब्दात त्याला उदाहरण देऊन काही गोष्टी समजावून सांगितल्या. पालक म्हणून अथर्वसोबत वागतांना आमच्या होत असलेल्या नेमक्या चुका आमच्या देखील लक्षात आणून दिल्या. त्यांच्याकडून परततांना माझ्या विचारांना एक नवी दिशा मिळाली होती. त्यांनी प्रत्येक छोट्या गोष्टींवर तोडगा सुचवला होता. माझी लेकाविषयीची चिंता आणि ताण बऱ्याच प्रमाणात कमी झाला होता. अथर्वशी वागतांना मी त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा अवलंब केला. त्यावेळेची मला अथर्वच्या वागण्यातील फरक जाणवला. त्यानंतरच्या २-३ भेटीत मनीषाताईंची आणखी काही स्वभाव वैशिष्ट्ये स्पष्ट होत गेली. एक समुपदेशक, योग शिक्षिका म्हणून त्या अगदी यशस्वीपणे भूमिका बजावतात हे समजले. माझ्यामते, मुलांशी वागतांना खूप पालकांना अडचणी नक्कीच येतात. मात्र योग्यवेळी जर मनीषाताईसारख्या समुपदेशकाचा सल्ला घेतला तर गुंतागुंत कमी होऊन प्रश्न पटकन मार्गी लागतात.
Radhika Rahul Limaye
Pune
In 2013, My son, just started teenage. At that time it was very helpful to talk over teenage problem and tantrums with someone with an independent view. Manisha tai listened well and pointed me to techniques, particularly discipline, which have helped me to be a better mother. Regular conversations really supported me a lot.
My adopted daughter Priya brought lot of happiness in the family. We adopted her at the age of 12. There were many challenges because of different cultures and challenged background of the child. With Manisha tai’s counselling sessions the adoption journey became stress free and enjoyable. Got the clarity with - How to connect with the child, where I can make compromises and where I cannot. She encouraged me to utilize the first year of adoption very well and set the foundation of discipline, values and trust.
I am Shashi Iyer, a mother of one, that translates to a bunch of education and career related choices and decisions. As my daughter approached her elementary examination, I knew it was time for us to decide onto a plan. The mutual decision was to take up sciences and prepare for medicine entrances - however, that did not turn out well. That’s when I approached my friend Manisha Naik who not only deals with career counselling but also specializes in parental views to understand the same. The conflict was when my daughter decided not to go ahead with medicine and pursue business management instead. She had a plan chalked out but as a mother I had my own doubts. Approaching Manisha not only softened the tensions but also I was an ally to my daughter who understood the other side of the story ; thanks to her parental counselling.
Dr. Sanjay Naphade & Dr. Snehal Naphade
Nandura
The counselling provided by Manisha Naik Ma'am made a huge impact for us and our daughter Manasi. Ma'am was harsh when she was slacking in studies and her biggest motivator when she was feeling down. Ma'am draws inferences from her own experiences and that really helped a lot.
अतुल. वा. पाटील
अकोला
मनीषा नाईक मॅडम ची counselling ही माझ्या मुलाला त्याच्या उच्य माध्यमिक शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला फार उपयोगी आली , त्याने आमचे पुढचे मार्ग अतिशय स्पष्ट दिसायला लागले . Counselling सोबत नाईक मॅडम चे योगासन व बौद्धिक , वैचारिक आणि शारीरिक प्रगतीसाठी चे धडे आपल्याला आयुष्यभर मदत करतील याची मला खात्री आहे !
माझी लेक १२/१३ वर्षाची असतांना मला जाणवले की तिला खोटं बोलण्याची सवय लागली आहे. थोडया-फार प्रमाणात सर्व जण खोटं बोलत असतात. पण हिचं दोन वाक्यातल एक वाक्य खोटं असायचं. आधी मी तिला समजावून सांगायचा प्रयत्न केला. नंतर रागावून बघितलं. आणि शेवटचं अस्त्र म्हणजे मारलं सुध्दा. पण तिची सवय काही जात नव्हती. शेवटी मी मनिषा ताईंना फोन केला. त्यांच्याशी बोलल्यावर मला जाणवले की आपण कुठे चुकतोय. त्यांनी सांगितल्या प्रमाणे मी तिच्याशी वागायला लागले आणि फरक दिसायला लागला. तिची ही सवय हळूहळू कमी होत गेली. त्यांच्यामुळेच आज मी माझ्या लेकीची Best Friend आहे.
Tapasya Pathak
Pune
"I met Mrs. Manisha Naik when my daughter was struggling with anxiety. She is intelligent child and outperformed in studies. But during her crucial academic year she lost interest in studies ,also impacted her health. She started doubting herself, With Manisha Madam’s support I would no longer see Swara as an anxious person. She completely understood what exactly is Swara's problem and what is her needs, slowly made her realise the power of self trust, she even gave step by step guidance to Swara on how to plan her studies which will ease her stress. Manisha Madam, not only had a session with her but also with me and my husband. She also showed us mistakes we do unknowingly during parenting. She showed all three of us " it is ok to fail" and "it is ok to make mistakes". This also gives courage to face every challenge fearlessly. This interaction with Manish ma’am will impact Swara’a entire life not only current stage ."
सौ अमिता अरविंद घाटोळ
अकोला
माझ्या पहिल्या ( १९९६ ) प्रेग्नेंसी मध्ये मला High BP चा (210/150) त्रास झाला होता. त्यामुळे मी माझे आरोग्या करिता काहीतरी केले पाहिजे ही भावना मनात घेऊन काही करता येईल का, या भावनेने आपण ओमकार, प्राणायाम व योगासने करू शकलो तर आपल्या दैनंदिन जीवनात आपले आरोग्य चांगले राहील या निर्णयाप्रत पोहोचले. त्याप्रमाणे मी जमेल तसे वाचन, टिव्ही चे माध्यमातून माहीती मिळवून व सोबत दररोज पायी फिरण्याचे अंमलात आणू लागले. माझ्या दुसऱ्या प्रेग्नेंसीचे वेळेस (२००४) मध्ये मला १९९६ चे वेळेस मला झालेल्या High BP ची भीती वाटू लागली. डॉक्टरांसोबत कन्सल्ट केल्यानंतर, त्यांनी आधीच्या प्रेग्नेंसी मध्ये High Blood Pressure असल्यामुळे मला काळजी घेण्याचे सुचवले. त्याच वेळेस मी डॉ.सौ मनिषाताई यांच्या संपर्कात आले. त्यांनी मला दररोज ॐकार, प्राणायाम व योगासने जर केलेत तर तूझे BP नियत्रणांत राहू शकते असे सांगीतले. मला येथे आवर्जुन सांगावयास आवडेल की, त्यावेळेस सौ. मनिषाताईनी मला जे विशिष्ठ ॐ कार, प्राणायाम व योगासनाचे प्रकार सांगीतले व माझे कडून करवून घेतले तसेच सकारात्मक विचार दिलेत. त्यामुळे माझे BP वाढणे तर दूरच परंतु रक्तदाब नियंत्रणाची गोळी सुद्धा घेण्याची गरज पडली नाही व माझे बीपी चे पर्यायाने प्रेग्नन्सी मधील High BP पासून सुटका झाली. सौ. मनिषाताई यांच्या त्या वेळेसच्या योग् मार्गदर्शनामुळे रक्तदाबच नाही तरआरोग्याच्या इतर तक्रारी पासूनही मी दूर राहिले. त्यांचे समुपदेशन माझ्या विश्वासात भर टाकत होते. अशक्य वाटत होते ते ताई च्या मार्गदर्शनाने छान गुटगुटीत बाळाचा जन्म झाला. सौ. ताईंचे मनःपूर्वक आभार ! ईश्वर चरणी सर्वाना निरोगी व दिर्घायुष्य लाभो हिच प्रार्थना...
Manisha madam is known to me since long as a very good human being. I got to know her more closely when I approached her while my son was preparing for Medical Entrance Exams (NEET). As you all must be knowing that NEET exam is one of the toughest competitive exam. While preparing for it, a child goes through so many different emotions like anxiety, depression, inferiority complex, over confidence etc. which the child has never experienced before. Hence while preparing for such exams, a child needs not only proper academic guidance but also a strong psychological support to withstand the stress. For this we approached Manisha madam. Manisha madam is a counselor par excellence, a very down to earth and easily approachable person having solutions for all your queries. By the perfect blend of real life incidences, meditation, humor, stories, yoga etc she handled my child so well that there was never ever a worrisome moment later. Our ties with Manisha madam has helped my child to focus on his studies as well as develop peace of mind which helped him crack the NEET Exam. During her counselling sessions we realised that along with the child, we as parents need to be counselled as well regarding our behaviour with the child as well as creating the right ambience for him to develop a positive attitude and peace of mind. And we followed this. I would always be grateful to Manisha madam for her guidance and support.
लाभशेटवार बालाजी उत्तमराव
उमरखेड
मी माझ्या मोठया मुलास चिं. ओकांर यास अकोला येथे आयआयटी (IITJEE) च्या तयारीसाठी ठेवले होते. तसे या परिक्षेची तयारी स्वरूप आणि इतर बाबी आमच्या कुंटूंबीयासाठी अभिज्ञ होत्या. आणि माझा मुलगाही थोडासा नाजूक व भावनाप्रधान असल्याने आम्ही तणावातच होतो. कारण फक्त परिक्षेची तयारीच नाही तर ते करताना येणारे अडथळे याचीही चिंता होती. अशा तणाव काळात माझ्या मुलास व आमच्या कुंटूबास आधार ठरल्या त्या डॉ. मनिषा नाईक. परिक्षेची तयारी करताना येणारे अपयश, खचलेला आत्मविश्वास पून्हा उभा करण्याचे कौशल्य डॉ. मनिषा नाईक यामुळे शक्य झाले. घरापासून दुर असलेल्या मुलांसाठी त्यांचे प्रश्न समजुन मुलांना पून्हा प्रवाहात आणण्यासाठी मार्गदर्शन व विशेषत : मानसीक आधार दिला. नैराश्य आलेल्या मुलांना समजून घेऊन १० मिनीटात पून्हा लक्षासाठी तयार करण्याची त्यांची हातोटी, पालकांनी मुलांना समजुन घेताना ठेवायचा संयम व जबाबदारी या सर्वाचा परिणाम माझा मुलगा पाहिल्याच प्रयत्नात IIT हैद्राबाद येथे प्रवेशीत झाला. त्याच्या या यशात डॉ.मनिषा नाईक यांचे समुपदेशन मैलाचा दगड ठरले एवढे मात्र निश्चीत. आम्ही सर्व कुंटूंबीय त्यांचे ऋणी आहोत.